|| मराठे, नर्मदा नदी आणि उत्तरप्रदेश सीमेपर्यंत धडक ||

|| मराठे, नर्मदा नदी आणि उत्तरप्रदेश सीमेपर्यंत धडक ||
मराठ्यांनी नर्मदा ओलांडून माळव्यात प्रवेश तर केलाच पण त्याच बरोबर उत्तरप्रदेश सीमेपर्यंत देखील धडक मारलेली दिसते, सर्वप्रथम आपण माळव्याची भौगोलिक रचना थोडक्यात पाहूया. नैसर्गिक बनावटीच्या आधारावर संपूर्ण माळवा भाग चार भागात विभागता येतो. १) पूर्व-पूर्व पठार क्षेत्र (आपत्ती क्षेत्र)२) केंद्रीय पठार क्षेत्र ३) उत्तर-पश्चिम पठार क्षेत्र आणि ४) नर्मदाची दरी
नर्मदा आणि मराठे याविषयीच्या काही नोंदी पाहिल्या असता असे दिसून येते की मराठ्यांनी नर्मदा १६९० मध्येच पार केलेली दिसते. Malcolm नावाचा एक अधिकारी याबद्दल माहिती देतो, तो नोंदवतो की "The Maratha raids on Dharampuri began from the year 1690 and were repeated in 1694,1696 and 1698." विशेष म्हणजे याच नोंदीत तो मराठ्यांनी १६९८ साली मांडूचा किल्ला जिंकला असा उल्लेख करतो. या वरील मोहिमांची सविस्तर माहिती आपल्याला इतर साधनात शोधावी लागतील ते लवकरच समोर देखील आणण्याचा प्रयत्न करू ..
१६९८-१६९९ या दरम्यान मराठे आणि नर्मदा यांच्या संबंधित माहिती घेताना थोडा मागील इतिहास पाहणे आवश्यक आहे. जिंजीहुन छत्रपती राजाराम महाराज जानेवारी १६९८ मध्ये निसटले आणि २२ मार्च १६९८ रोजी विशाळगडाला आले. याच दरम्यान मराठे वऱ्हाड, खानदेश भागात पसरू लागले होते. बागलाणात दाभाडे, खानदेशात नेमाजी शिंदे, कृष्णा सावंत, वऱ्हाडात परसोजी भोसले तर मध्य महाराष्ट्रमध्ये सेनापती धनाजीराव जाधव आणि हणमंतराव निंबाळकर, दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात बहिर्जी घोरपडे आणि राणोजी घोरपडे. १६९८ मध्ये सेनापती धनाजीराव जाधव यांच्यासह नेमाजी शिंदे हे बुऱ्हाणपूरास आले आणि त्यांनी बुऱ्हाणपूरला वेढा घातला, मोगलांनी शिकस्त केली पण मराठ्यांनी नासधूस केली तिथून तीन दिवसांनी सेनापती धनाजीराव जाधव, नेमाजी शिंदे यांनी नंदुरबार शहरावर हल्ला केला. यात मोगल इतिहासकार खाफिखान स्पष्ट नोंदवतो की अकबरपुरच्या उतारावरून मराठ्यांनी नर्मदा ओलांडून जाण्याचा विचार केला होता पण ते नंदुरबारकडे वळाले...No automatic alt text available.
१६९९ च्या सुरुवातीला छत्रपती राजाराम महाराजांनी कर्नाटकमध्ये स्वारी केली, ही मोहिम दोन महिन्याची होती. मराठे कर्नाटकात धारवाड, हुबळी, सावनूर, शिमोगा पर्यंत पोहचले. ही मोहीम संपवून छत्रपती राजाराम महाराज मार्च १६९९ ला विशाळगडावर आले. १६९९ मध्ये मराठ्यांची आक्रमणे औरंगाबाद, वऱ्हाड, खानदेश या भागात सुरू होती, औरंगजेबास १६ एप्रिल १६९९ रोजी हरकऱ्यांच्या तोंडून कळले की कृष्णा सावंत हा मोठे सैन्य घेऊन वऱ्हाड प्रांतात हालचाल करत आहे. २ जुलै १६९९ छत्रपती राजाराम महाराज हे तळकोकणातून सातारा येथे आले. याच दरम्यान छत्रपती राजाराम महाराज यांनी गौंड राजा निगुणबक्त याची भेट घेतली ( ऑक्टोबर १६९९)
मराठ्यांचे धाडस आणि वाढलेली दहशत, धामधुमीच्या बातम्या औरंगजेबाच्या कानी पडत होत्या, बादशाहने स्वतः मोहिमेवर जाण्याचा आणि मराठ्यांचे निवासस्थान म्हणजे किल्ले जिंकण्याचा निर्धार केला. याच सुमारास बादशहास कळले की मराठा नर्मदा ओलांडून माळव्यात घुसले. कृष्णा सावंत १५ हजार स्वारांनिशी नर्मदापार झाला, त्याने धामुनी या गावाजवळच्या प्रदेशात धामधूम उडवली. कृष्णा सावंत त्यांनतर मागे फिरला. या मोहिमेबद्दल मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना म्हणतो " मुसलमान सुलतानाच्या काळापासून आजपर्यंत मराठे कधीच नर्मदापार झाले नव्हते "
निष्कर्ष असा की मराठ्यांनी हा नर्मदापार करून जो माळव्यात घुसण्याचा पराक्रम करून जो मार्ग मोकळा केला तो शेवटपर्यंत हाच मार्ग राहिला. कृष्णाजी सावंत यांची माळवा स्वारी ऐतिहासिक होती . त्यांनी नर्मदेपार जाण्याचा मार्ग निर्माण केला आणि त्यामुळे माळवा मराठ्यांच्या अंमलात आला. तदनंतरच माळव्यात होळकर , शिंदे आणि पवारांना तिथे आपला जम बसविता आला व सत्ता उपभोगता आली . होळकर , शिंदे , पवार यांच्या सत्तेची पायाभरणी कृष्णाजी सावंत यांच्या मोहीमेनी केली हे निर्विवाद..
🔥|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||🔥

Comments