वीर मुरारबाजी देशपांडे


अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडच पाणी पळवणाऱ्या, स्वामिनिष्ठा आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे वीर मुरारबाजी देशपांडे हे पुरंदरच्या लढ्यात कामी आले.
मुरारबाजींना दिलेरखानाने मुघल चाकरीत येण्याचं प्रलोभन द्यावं इतका दिलेरखान प्रभावित झाला या लढ्याचा बखरीतील उल्लेख काही असा
मावळे लोकांनी व खासा मुरारबाजी यांनी निदान करून भांडण केलें. पांचशे पठाण लष्कर ठार जाहाले. तसेच बहिले मारिले. खासा मुरारबाजी परभू दिलेरखानाच्या देवडी पावेंतों साठी माणसांनिशी मारीत शिरले. दिलेलखान देवडी सोडून माघारा जाहला. आणि लोकांस सांगून तोफखाना व तिरंदाज बरच्या व आडहत्यारी एक हजार लोक यांजकडून मार करविला. त्यामंधी साठी लोक पडिले.
मुरारबाजी परभू यांनी धाल फिरंगी घेऊन दिलेलखानावरि चालोन आले. महाराजांचे नांवाजलेले लोक ते खर्च जाहाले. आतां काय मुख दाखवावे? म्हणोन नीट चालोन जावें असें मनांत आणोन खानाशी गांठ घातली. तेव्हां दिलेलखान बोलिला जे, " अरे तूं कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नांवाजितो." ऐंसे बोलतां मुरारबाजी बोलिला जे, "तुझा कौल म्हणजे काय ? मी शिवाजी राजाचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय ?" म्हणून नीट खानावरी चालिला. खानावर तरवारीचा वारकरावा तों खानाने आपले आंगे कमाण घेऊन, तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडांत अंगोळी घातली किं, " असा शिपाई खुदाने पैदा केला." ऐसे आश्चर्य केले.
आता याच्या पुढे
Image may contain: 1 person, outdoor
"मुरार सारखा धुरंदर पडला तरी पुरंदर मात्र लढतचं राहिला" आणि हेच प्रकरण विसरले जाते,डावलले जाते मुरारबाजींच्या मृत्यूनंतर किल्ला मराठ्यांनी मोघलांच्या हवाली केला असे नाही, मुरारबाजी पडले परंतु तरीही मराठे पाठ भिंतीला टेके पावतो लढा देतच राहिले एक एक मराठा जीवाच्या बाजीने लढत राहिले याकाळात तलवार गाजवत होते ते लहानपणा पासून शिवरायांसोबत संबंध आला त्या सणस घराण्यातील पिलाजीराव सणस, मुळात पिलाजीराव सणस हे शहाजीराजांच्या काळापासूनच इतिहासात वावरताना आढळतात.
मुरारबाजी पडल्या नंतर अतिचिवट पणे मराठ्यांना धीर देत हे युद्ध पिलाजीराव सणस यांनी चालूच ठेवले. अखेर शिवरायांनी ११ जून १६६५ मध्ये तह झाल्या नंतरच किल्ला मोघलांच्या स्वाधीन करण्यात आला....
🔥|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||🔥

Comments